27 एप्रिल पासून विमानसेवा नियमित सुरु होणार

0
10

नरेश तुप्तेवार

नांदेड,दि.23(berartimes.com)- येथील श्री गोंबिदसिंघजी विमानतळावरुन प्रवासी विमान वाहतुकीसाठी 27 एप्रिलपासून नियमीत विमानांचे उड्डाण होणार आहे. यासाठी विमानतळ प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने लागणाऱ्या सर्व बाबींची चाचणी घेऊन विमानतळ वाहतुकीसाठी आजपासून सज्ज असल्याची माहिती नांदेड विमानतळ प्रशासनाने दिली.देशाअंतर्गत विमानांची सेवा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. विशेषत: शहर आणि त्या-त्या विभागांचा विकास होण्यासाठी ही महत्वाची ठरत असते. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण या योजनेअंतर्गत देशातील बंद असणाऱ्या 24 विमानतळांना पुर्नजिवीत करण्याचा प्रयत्न पंतप्रधान यांनी केला. यात महाराष्ट्रातील नांदेडसह सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव या शहरातून विमानसेवा सुरू करण्यात येण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यात वेळापत्रकानुसार नांदेड विमानतळाहून सर्वप्रथम विमानसेवा सुरू होणार होते. पण वेळेच्या अगोदरच नांदेड-हैद्राबाद 72 आसानी ट्रूजेट या विमान कंपनीने 27 एप्रिल रोजी विमान सुरू केले असून यासाठी विमानतळ प्रशासनाने लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

नांदेड विमानतळ प्रशासनाकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार, आरोग्य विभाग यासह इतर विभागाच्या बैठक नांदेड विमानतळ येथे पार पडली. यावेळी विमानतळ प्रशासनाने वाहतुकीसाठी विमानतळ आजपासून सज्ज असल्याचेही सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजेच जवळपास 7 ते 8 वर्षांपासून विमानतळ बंद होते. महत्वाच्यावेळी विमानतळ वापरात येत होते. पण आता 27 एप्रिलपासून दररोज विमानतळावरून विमानांची उड्डाण होणार असल्याले विमानतळावरील असणाऱ्या सुविधा म्हणजेच यात फॅन, लाईट, प्रवाशांसाठी आसान व्यवस्था, तिकीट बुकिंग, शौचालय या आदी गोष्टींची दुरूस्ती करण्यात आली. यामुळे विमानतळ वाहतुकीसाठी आज सज्ज असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.