पालकमंत्री बडोले १ मे रोजी जिल्ह्यात

0
13

गोंदिया,दि.३० : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज १ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी ६.३० वाजता सडक/अर्जुनी येथून गोंदियाकडे प्रयाण. सकाळी ७.१५ वाजता गोंदिया येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी ७.४० वाजता विश्रामगृह येथून कारंजा येथील पोलीस मुख्यालयाकडे प्रयाण. सकाळी ८ वाजता कारंजा पोलीस मुख्यालय येथे आगमन व महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करतील. सकाळी ८.३० वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. सकाळी ११ वाजता भिमघाट येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्याला उपस्थिती. दुपारी १२.३० वाजता गोंदिया येथून सडक/अर्जुनीकडे प्रयाण व राखीव. दुपारी २ वाजता सडक/अर्जुनी येथून नवेगावबांधकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता नवेगावबांध विश्रामगृह येथे आगमन. दुपारी ३ वाजता नवेगावबांध येथून झाशीनगर उपसा सिंचन योजनेच्या कामाचे पाहणी करण्यासाठी येरंडीकडे रवाना. सायंकाळी ५.३० वाजता येरंडी येथून सडक/अर्जुनीकडे प्रयाण व राखीव. सायंकाळी ७.३० वाजता सडक/अर्जुनी येथून नागपूरकडे प्रयाण करतील.