सुलेखा कुंभारे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगावर

0
13

नवी दिल्ली, दि.25: राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अर्थात ‘एनसीएम’मधील रिक्तपदावरून विरोधकांच्या टीकेचा सामना करत असलेल्या केंद्र सरकारने आयोगात अध्यक्षांसह पाच सदस्यांची नियुक्ती केली आहे. उत्तर प्रदेशमधील समाजसेवक गयरूल हसन यांना आयोगाचे अध्यक्ष बनविण्यात आले असून, महाराष्ट्रातील माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सात सदस्यीय ‘एनसीएम’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी उत्तर प्रदेशचे समाजसेवक गयरूल हसन यांच्याकडे देण्यात आली आहे. अल्पसंख्याक मंत्रालयातील सूत्रानुसार उर्वरित चार सदस्यांमध्ये केरळमधील भाजपचे नेते जॉर्ज कुरिअन, महाराष्ट्रातील माजी मंत्री सुलेखा कुंभारे, गुजरातमधील जैन प्रतिनिधी सुनील सिंघी आणि दस्तूरजी खुश्रीद यांचा समावेश आहे. याशिवाय शिल्लक दोन सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.