देशातील सर्वात मोठ्या पुलाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

0
6

गुवाहाटी,दि.26- आसाममध्ये ब्रम्हपुत्रेच्या उपनदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या (9.15 किमी)पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज(शुक्रवारी) लोकार्पण करण्‍यात आले. आसाममधील ढोला आणि अरुणाचलमधल्या सदियाला जोडणारा हा पूल लष्करासाठी अत्यंत फायद्याचा असल्याचे प्रतिवादन मोदींनी यावेळी केले.
आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यावेळी उपस्थित होते. तिनसुकिया येथे ब्रम्हपुत्रा नदीच्या उपनदीवर बांधण्यात आलेला हा देशातील सर्वात लांबीच्या पूल आहे. या पुलाची लांबी 9.15 किलोमीटर आहे. हा पूल बांधण्यात आल्याने आसम आणि अरुणाचल प्रदेशमधील अंतर 165 किलोमीटरने कमी होणार आहे. पुलापासून चीनची सीमारेषा 100 किमी (हवाई) अंतरावर आहे.

आसम-अरुणाचल प्रदेशातील अंतर पाच तासांनी कमी…
– आशियातील दुसरा सर्वात मोठा पूल आहे. आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील ढोला आणि अरुणाचल प्रदेशातील सदियाला जोडणार्‍या या पुलामुळे दोन्ही राज्यांतील अंतर पाच तासांनी कमी झाले आहे. पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 2056 कोटी रुपये खर्च करण्‍यात आला आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक पुलापेक्षा हा पूल 3.55 किमीने मोठा आहे.