कर्नाटकमध्ये बीएस येडियुरप्पा भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

0
7
नवी दिल्ली, दि. 26 – कर्नाटकमध्ये होणा-या आगामी विधानसभा निवडणुकीत बीएस येडियुरप्पा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. दक्षिणेत कर्नाटकमध्ये भाजपा पहिल्यांदा सत्तेवर आली. त्यावेळी येडियुरप्पा मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते.
 सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पुढच्यावर्षी मे 2018 मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. के.सिद्घरमय्या सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. पीटीआयशी बोलताना अमित शहा यांनी कर्नाटकसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपानीच गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे संकेत अमित शहा यांनी दिले.