पॅन, आधार कार्डवरील दुरुस्ती होणार आॅनलाईन

0
9

नवी दिल्ली, दि.२९: आयकर विभागाने पॅनकार्ड धारकांना त्यांच्या नावामधील चुका व अन्य तपशील सुधारण्यासाठी आॅनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. पॅन व आधार या दोन्हीमधील नावांमध्ये असलेल्या चुका या पद्धतीच्या आॅनलाईन पद्धतीमुळे दुर करता येणार आहेत.
याआधी पॅन कार्ड व आधार कार्डमध्ये अनेक चुका आढळून येत होत्या. नाव चुकीचे असणे, फोटो दुसऱ्याची असणे, फोटो एक अन् नाव दुसरेच असणे नाव्याच्या स्पेलींगमध्ये चुका अशा अनेक चुका घडून येत होत्या. या चुका दुरुस्तीसाठी नागरीकांना परत कागदपत्रांची पुर्तता करावी लागत होती. यामुळे नागरीकांना मानसीक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या आॅनलाईन सुविधेमुळे नागरीकांचा त्रास कमी होण्यास मदत मिळणार आहे. आधार हे बायोमेट्रिक पद्धतीने तयार केलेले कार्ड असून ते पॅन कार्डषी संलग्न करण्याचीही योजना आहे. आयकर विभागाने दोन स्वतंत्र हायपरलिंक्स या कामासाठी ई – फायलिंग वेबसाईटवर उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये विद्यमान पॅनकार्डमध्ये अर्जही करता येणार आहे.