मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्हयाचा सन्मान

0
5

गोंदिया,दि.१९ केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने आज नवी दिल्ली स्थित विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांसह केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या महाराष्ट्राला केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या (मनरेगा)प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातून गोंदिया जिल्हयाला सन्मानीत करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी रविंद्र ठाकरे आणि माजी जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मनरेगाच्या अमंलबजावणीत तांत्रिक दृष्टया प्रभावीपणे कार्य करण्यासाठी राज्यातून अमरावती जिल्हयाचा सन्मान करण्यात आला. अमरावती जिल्हयातील चिखलदरा तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तांत्रिक अधिकारी निकेश निंबाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चिखलीसह देशातील तीन ग्रामपंचायतींना यावेळी सन्मानीत करण्यात  आले.