जलयुक्त शिवार योजनेत मोहाडी व तुमसर तालुका जिल्ह्यात प्रथम

0
7

भंडारा,दि.25-जलयुक्त शिवार योजनेत आ. चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाने तुमसर व मोहाडी तालुका अव्वल ठरला आहे.मोहाडी तालुक्याला ५ लाखाचे प्रथम बक्षीस तर तुमसर तालुक्याला ३ लाखाचे द्वितीय बक्षीस तसेच जिल्ह्यातील गाव प्रवर्गातून १ लाखाचे प्रथम बक्षीस मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव, करडी, ७५ हजार, दुसरे बक्षीस नरसिंग टोला ५0 हजार, तिसरे बक्षीस तुमसर तालुक्यातील पवनारखारी ३0 हजार, चौथे बक्षीस महेगाव, २0 हजार, पाचवे बक्षीस म्हणजे जिल्ह्यातून तालुका प्रवर्गातून तसेच गाव प्रवर्गातून दोन्ही बक्षीस तुमसर व मोहाडी तालुक्यातीलच गावांना जाहीर झाले. यात २0१५-१६ वर्षात एकूण १३ कोटी कामे झालेली आहेत. या योजनेचा फायदा दोन्ही तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना झालेला आहे.
यावेळी मोहाडी तालुका कृषी अधिकारी पाथ्रीकर, तुमसर तालुका कृषी अधिकारी बावधने व संपूर्ण योजनेतील अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन करून विविध योजनेची शेतकर्‍यांपर्यंत माहितीसह लाभ पोहोचविण्याचे आवाहन आ. चरण वाघमारे यांनी केले. सरकारने शेतीच्या शाश्‍वत विकासाठी तयार केलेल्या धोरणात जलयुक्त शिवार योजना महत्त्वाची ठरली. मागील दोन वर्षात या योजनेमुळे राज्यातील दुष्काळग्रस्त गावे न्युट्रल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दोन वर्षात ११,४८३ गावांमध्ये २ लाख ६५ हजार ६७८ कामे झाली असून शाश्‍वत सिंचनाचे स्रोत खुले झाले आहे. अनेक गावात प्रथमच पाणी साठे तयार झाले. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या ३ हजार ४२२ कोटी रुपयांत ११ लाख ६४ हजार ३४७ हेक्टर इतकी सिंचन क्षमता (४२ टीएमसी) जलसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे राज्यातील शेती सुजलाम् सुफलाम् झालेली आहे.