लिटिल फ्लावर शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

0
22

लाखनी,दि.30-द लिटिल फ्लावर इंग्लिश शाळेच्या ७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लाखनी येथील लिटिल फ्लावर शाळेचे इयत्ता पाचवीचे विद्यार्थी विनीत लेकुरवाले, समिग्रा वनवे, चांदणी रामटेके, आयुष निखाडे, विक्रांत शहारे, आर्यन राहांगडाले, दिशांत भाजिपाले या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. शाळा सचिव संजय वनवे, शाळा विश्वस्त महेंद्र राऊत, शाळेच्या प्राचार्या कल्पना भोयर, सहा. शिक्षक आशीष बडगे, प्रशांत वाघाये, अनमोल भोयर, प्रतिक्षा बंसोड तसेच सर्व शिक्षकवृंदांनी सर्व यशश्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत लिटिल फ्लावर शाळेने विविध क्षेत्रात आपल्या अस्तित्वाचा एक आगळा वेगळा ठसा उमटवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.