दोन दिवसांत ३६ लाख शेतकऱ्यांची यादी

0
15

मुंबई दि.30- दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्‍कम भरावी. त्यानंतरच सरकार दीड लाखाची रक्‍कम कर्जखात्यात जमा करणार असून, हे शेतकऱ्यांच्याच हिताचे आहे. कारण बॅंक आधी कर्जावरील व्याजाची रक्‍कम वसूल करते. सरकारने आधी पैसे भरले तर ते व्याजातच जातील व शेतकरी कर्जबाजारीच राहतील, असे स्पष्ट करत दोन दिवसांत ३६ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. ही आकडेवारी जिल्हानिहाय असेल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्रालयात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीची जाहीर झालेली आकडेवारी योग्यच असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की ३६ लाख शेतकऱ्यांची आकडेवारी तयार आहे. त्याबाबत सरकार दोन दिवसांत यादी प्रसिद्ध करेल. सरकारकडे सर्व शेतकऱ्यांची माहिती आहे. सध्या आकडेमोड वेगाने सुरू आहे. काही नवीन गणितज्ज्ञ तयार झाले आहेत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.