सिंदीटोला येथे तलाव तेथे मासोळी अभियानाचा शुभारंभ

0
24

तिरोडा,दि.३० : जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलावातून मत्स्योत्पादन घेवून यावर उपजिविका करणाऱ्या कुटूंबियांचे जीवनमान उंचावण्यासाठी तलाव तेथे मासोळी अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाचा शुभारंभ ३० जून रोजी तिरोडा तालुक्यातील सिंदीटोला येथे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे मुख्याधिकारी सी.पी.साहू, नितीन शिराळकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, वर्षा लांडगे, तहसिलदार संजय रामटेके, उपविभागीय कृषि अधिकारी श्री.नायेनवाड, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, तालुका कृषि अधिकारी श्री.पोटदुखे, मत्स्यविकास अधिकारी श्रीमती सलामे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मत्स्यपालन सहकारी संस्था सिंदीटोलाचे अध्यक्ष श्री.शेंडे, उपाध्यक्ष रविंद्र देवतळे, सचित बी.एम.तुमसरे, सदस्य सर्वश्री कुवरलाल खुळसिंगे, योगराज शेंडे, मधुकर मारबते, संजय शेंडे, ओमप्रकाश तुमसरे, अनिल देवगडे, रुखमाबाई मारबते, तसेच तलाव तेथे मासोळी विभागीय अभियानाअंतर्गत मास्टर टड्ढेनर्सचे प्रशिक्षण घेतलेले २० व्यक्ती यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोहू, कतला, मृगळ व सायप्रिनस जातीच्या माशाचे बोटूकली तलावात सोडण्यात आली.