मन की बात मुळे रेडिओला अच्छे दिन

0
15

नवी दिल्ली,19 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मन की बात’ या कार्यक्रमामुळे सरकारी रेडिओ स्टेशनला अच्छे दिन आले आहेत. ऑल इंडिया रेडिओला मन की बात मुळे दहा कोटी रुपयांची कमाई झाली असल्याची माहिती माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी लोकसभेत दिली. प्रधानमंत्री मोदींच्या मन की बातमधून ऑल इंडिया रेडिओने 2016-17या आर्थिक वर्षात 5.19 कोटींची कमाई केली आहे, तर 2015-16 मध्ये 4.48 कोटींची कमाई केली होती.
3 ऑक्टोंबर 2014 मध्ये मन की बात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बादद्वारे जनतेशी संवाद साधतात. मन की बातमधून देशातील महत्त्वाच्या घटनांवर पंतप्रधान भाष्य करतात. यासोबतच देशातील सणांनिमित्त शुभेच्छा देतात. याशिवाय चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे कौतुकदेखील केले जाते. मन की बात कार्यक्रमादरम्याने रेडिओला जाहिराती पोटी 10 सेकंजाला 2 लाखाची कमाई होत असल्याचे यावेळई मंत्रिमहोदयांनी सांगितले.