ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. यशपाल कालवश

0
8

नवी दिल्ली, दि. 25 – ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. यशपाल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. प्रा. यशपाल यांच्या कार्याची दखल घेत 1976 साली पद्मभूषण व 2013 साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 1983-1984 दरम्यान ते योजना आयोगाचे मुख्य सल्लागार होते. 1986 ते 1991 पर्यंत त्यांनी यूसीजीचे अध्यक्षपद भूषवले आहे. तर 2007 पासून 2012 पर्यंत प्रा. यशपाल जेएनयूच्या कुलपतीपदी होते. शिवाय दूरदर्शनवरील विज्ञानासंबंधी कार्यक्रम ‘टर्निंग पॉईंट’चे त्यांनी सूत्रसंचालन केले आहे.यशपाल यांनी पंजाब विद्यापीठातून 1949 साली भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर 1958 साली मॅसेच्यूसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून भौतिकशास्त्रातच पीएच.डीही मिळवली होती. वैज्ञानिक तथ्ये आणि त्यांची प्रक्रिया सोप्या शब्दांत त्यांनी मांडल्या. त्यांनी अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्य केले आहे.