शॉप, रेस्तरॉ आणि मॉल्स 24X7 सुरु राहाणार

0
19

मुंबई,दि.11- राज्यभरातील दुकाने रेस्तराँ आणि मॉल्स आता रात्रभर सुरु राहाणार आहे. आता तुम्हाला 24X7 खाण्यापिण्याची, शॉपिंगची चंगळ अनुभवता येणार आहे. दुकाने आणि आस्थापना कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत (बुधवारी) मध्यरात्री मंजूर करण्यात आले आहे.मात्र, हा निर्णय घेताना सरकारने दुकाने, हॉटेल सुरु ठेवण्याबाबत काही बंधने घातली आहेत.कोणत्या भागात कोणती दुकाने, आस्थापने किती वेळ सुरु ठेवायची याचा अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत‍. यासाठी पोलिसांकडून परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.महिला कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी पाळणाघर आवश्यक करण्यात आले आहे.दुकान किंवा आस्थापनांमध्ये 50 पेक्षा अधिक महिला काम करतात, तिथे पाळणाघराची व्यवस्था मालकांना करावी लागणार आहे.शंभरहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टिनची व्यवस्था करणे बंधनकारक असेल.तसेच महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी घरी सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी आस्थापना मालकांची असेल.त्याचबरोबर प्रत्येक आस्थापनेत सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे असेल, अशाही अटी ठेवण्यात आल्या आहेत.