अवघ्या चोविस तासात १३ वर्षिय मुलाचा शोध

0
28

@नांदेड रेल्वे पोलिसांची कामगिरी

ना़देड,दि.२४– नाराज होऊन घरातून निघून गेलेला निलेश सूर्यवंशी या 13 वर्षीय मुलाला रेल्वे पोलिसांनी 24 तासात शोधून काढून नांदेड रेल्वे पोलिसांची सर्वत्र अभिनंदन होत आहे
शोभा नगर येथील निलेश हा बुधवारी सायंकाळी घरातून निघून गेला होता .निलेशची कुटुंबातील व्यक्तींनी सर्वत्र शोधाशोध केली असता तो सापडला नाही . अखेर निलेशच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केली .यावेळी रेल्वे पोलिसाना देखील माहिती देण्यात आली .रेल्वे पोलिसांनी तात्काळ निलेश चा फोटो रेल्वे पोलिसांच्या watsup ग्रुप वर पाठवण्यात आला .अवघ्या 24 तासातच रेल्वे पोलीसांनी निलेश ला शोधून काढले . घरातील शूल्लक कारणावरून तो रागावून घरातून निघून गेला होता .रागाच्या भरात मुंबई ला जाण्याच्या उद्देशाने नांदेड मनमाड या रेल्वेने निलेश मनमाड गेला होता .रेल्वेत निलेशला झोप लागली आणि तो परत त्याच रेल्वेने नांदेड ला चुकून आला

वारंवार त्याने मुंबई ला जायाचं होत अस तो सांगत आहे . नांदेड रेल्वे स्टेशनवर ज्यावेळी परत तो पोहचला , रेल्वेतुन खाली उतरल्याने त्याला आपण नांदेड ला परत आलो असे कळाले निलेश ने पुन्हा विचार केला आणि तो पुन्हा मुबंई कडे जाणाऱ्या रेल्वेत बसला रेल्वे स्टेशन वर दिवटी वर असलेल्या यशवंत गायकवाड यांना तो मुबंई कडे जाणाऱ्या रेल्वे मध्ये दिसला निलेश ची चोकशी करून तात्काळ निलेशच्या नातेवाईकांना गायकवाड यांनी निलेश सापडला असी माहिती दिली .अन निलेश ला त्याच्या नातेवाईकांकडे सोपवले निलेश हा 24 तासात सापडल्याने नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.