राजकीय फायद्यासाठी हरियाणाला जळू दिले, हायकोर्टाने फटकारले

0
14
चंदीगड(वृत्तसंस्था)दि.26 – डेरा सच्चा प्रमुख गुरमीत रामरहिम याला लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर भडकलेल्या हिंसाचारावरुन हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारले आहे. या प्रकरणाच्या सुरक्षेवरुन पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी रामरहिम याला दोषी ठरवल्यानंतर जनहित याचिका दाखल झाली होती. तेव्हा हायकोर्ट म्हणाले होते डेरा प्रमुखाचा स्टेटस आता बदलला आहे, राज्यानेही आपल्या भूमिकेत बदल केला पाहिजे. हायकोर्ट तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती.
लैंगिक शोषणाचा आरोपात रामरहिम यांना सीबीआय कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर हरियाणात हिंसाचार भडकण्याच्या शक्यतेवर काय उपाययोजना केल्या, यासंबंधी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी सीबीआय कोर्टाने डेरा प्रमुखाला दोषी ठरविले. त्यानंतर पंजाब-हरियाणासह पाच राज्यांमध्ये हिंसाचार उसळळा. यात 32 लोक ठार झाले. 250 पेक्षा जास्त जखमी आहेत. सोमवारी (28 ऑगस्ट) रामरहिम यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. पंजाब-हरियाणासह पाच राज्यात उसळलेल्या हिंसाचारात जाळपोळ, दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान करण्यात आले. यावर हायकोर्टाने डेरा सच्चा सौदाची संपत्ती जप्त करुन नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
 हायकोर्टात सुनावणी दरम्यान वकीलांनी म्हटले की पॅरा मिलिटरी फोर्स आल्यानंतर घटनास्थळावरुन पोलिसांनी पळ काढला होता. यावर हायकोर्टाने हरियाणा सरकारचे अॅडव्होकेट जनरल बलदेव राज महाजन यांना, या बेजबाबदारपणासाठी कोण जिम्मेदार आहे, असा सवाल केला. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना हायकोर्टाने केली.  हायकोर्टाने अॅडव्होकेट जनरल यांना सांगितले की शनिवारी सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडा आणि घटनास्थळावरुन कोणते पोलिस अधिकारी पळून गेले त्यांचे नाव कोर्टासमोर आणा.