लालूंच्या ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ रॅलीला,तुफान प्रतिसाद

0
12

पाटणा(वृत्तसंस्था),दि.27 : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात आयोजित केलेल्या ‘भाजप भगाओ, देश बचाओ’ रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला असून लाखो नागरिक गांधी मैदानावर उपस्थित होते.पाटणातील ऐतिहासिक गांधी मैदानातून या रॅलीला सुरूवात झाली.विशेष म्हणजे शहरातील रस्तेही गर्दीने भरले होते.  या रॅलीत लालूप्रसाद यादव, पं.बगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबत जेडीयूचे बंडखोर नेते शरद यादव,काँग्रेसचे गुलाम नबी आझाद,कम्युनिस्ट नेते डी.राजा देखील उपस्थित होते.ही रॅली अभूतपुर्व ठरली असून गर्दीने आजपर्यंतचे सर्वच रेकार्ड तोडल्याचे बोलले जात असून ही गर्दी मतात बदलल्यास भाजपलाच नव्हे तर नितिशकुमारला सुध्दा कठिण होणार असल्याचे राजकीय  विश्लेषकांचे म्हणने आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यापासून शरद यादव चांगलेच नाराज आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या या रॅलीत विरोधी पक्षातील जवळपास 16 पक्षांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आरजेडी, काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमुल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा, राष्ट्रीय लोक दल आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या पक्षांनी सहभाग घेतला होता. मात्र काँग्रेसचे युवराज राहुल गांधी,बसपच्या नेत्या मायावती यांनी मात्र दांडी मारली.भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रोखण्यासाठी समचविचारी पक्षांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने पाटण्यात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने “भाजप भगाओ, देश बचाओ’ रॅली आयोजित केली होती. दरम्यान खासदार शरद यादव मंचावर येताच लालुप्रसाद यादव यांनी गळाभेट घेतली. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी तर  ट्विट करुन या बघा गांधी मैदानातील गर्दी रस्त्यावर पाय ठेवायला ही जागा नाही असे म्हटले आहे.तर लालुप्रसाद यादव यांनी लालू का रिकार्ड लालू की जनता ही तोडती है,आवो मैदान मे लडो लालू से,जनता बोल रही भाजपा भगाओ देश बचाओ असे ट्विट केले आहे.