प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रासाठी ९,८९४ घरांना मंजूरी

0
13

नवी दिल्ली,दि.28 : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत (शहरी) आज महाराष्ट्रासाठी 9,894 परवडणारी घरे मंजूर करण्यात आली आहेत. या मंजूरीसह महाराष्ट्राला एकूण १ लाख ४४ हजार १६५ घरे मंजूर करण्यात आली. यासाठी केंद्राकडून २ हजार २२४ कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्याव्यतिरीक्त १५ हजार ८६८ कोटी रूपयांच्या गुंतवणूकीस मंजूरी देण्यात आली आहे.
२० नोव्हेंबर २०१६6 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजने’ची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत सर्वांसाठी परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. या योजनेचे ग्रामीण आणि शहरी असे दोन गट करण्यात आले आहेत. आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अंतर्गत आज महाराष्ट्रासाठी ९ हजार ८९४ घरांना मंजूरी देण्यात आली.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत (शहरी) आज महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तामीळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड या दहा राज्यांसाठी निधी मंजूर केला आहे. या दहा राज्यांसाठी एकूण 26 लाख १३ हजार ५६८ घरे मंजूर केलेली आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून एकूण ४०,५९७ कोटींच्या आर्थिक सहाय्यतेला मंजूरी मिळाली आहे, तर 1 लाख 39 हजार 612 कोटी रूपयांच्या निधी गुतंवणूकीसही मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.