बेरार टाईम्सचा दणका ईओने केल्या शिक्षकांच्या समायोजन बदल्या रद्द

0
23

तत्कालीन बीईओ घरडेच्या गैरकारभाराचा पर्दाफाश
सेवानिवृत्तीच्या दिवशीच घरडेंच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश

गोंदिया,दि.३१-गोंदिया पंचायत समितीमध्ये पदाधिकाèयांना विश्वासात न घेताच आज ३१ ऑगस्ट रोजी दुपारनंतर सेवानिवृत्त झालेले उपशिक्षणाधिकारी व गोंदिया पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी घरडे यांनी जून ते ऑगस्ट महिन्यात केलेल्या शिक्षक समायोजनेच्या नावावरील सर्व शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिल्याने घरडेंच्या गैरकारभाराचे पितळ उघडे पडले आहे.विशेष म्हणजे बेरार टाईम्स न्युजपोर्टलने गोंदिया पंचायत समितीमध्ये समायोजनेच्या नावावर शिक्षकांच्या बदल्यांचा गोरखधंदा करुन आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे वृत्त ३० ऑगस्ट रोजी प्रसिध्द केले होते.ते वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली.

या पंचायत समितीमधील गैरव्यवहाराची माहिती सीईओ आर.एच.ठाकरे व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना बेरार टाईम्सच्यावतीने भ्रमणध्वनीवर देण्यात आली होती.त्यानंतर आज ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच शिक्षणाधिकारी नरड यांनी गोंदिया पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला भेट देऊन सर्व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतर जून ते ऑगस्ट दरम्यान तालुकास्तरावर केलेल्या शिक्षकांचे समायोजन व शैक्षणिक कार्यासाठी केलेली पदस्थापनेची १ सप्टेंबरपर्यंत सर्व केंद्रनिहाय आढावा घेऊन चौकशी अहवाल सादर करण्याकरिता उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले.सोबतच सर्व शिक्षकांचे आदेश तत्काळस्वरुपात रद्द करुन त्या सर्व शिक्षकांना पुर्ववत शाळेत रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यातच जे शिक्षक पुर्वीच्या मुळ पदस्थापनेच्या शाळेत रूजू होणार नाहीत,त्यांचे वेतन स्थगित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.शिक्षणाधिकारी यांच्यावतीने दिलेल्या पत्रात स्पष्टपणे तत्कालीन बीईओ घरडे यांनी नियमबाह्यरित्या शिक्षकांचे समायोजन केल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या कार्यकाळातील सर्वच प्रकरणाची अजून सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
गोंदिया पंचायत समितीमधील या सर्वगोंधळाबाबत बेरार टाईम्सने सभापती,उपसभापतीसह अधिकारी यांच्या लक्षात हे प्रकरण लक्षात आणून देत शिक्षकांच्या समायोजनाच्या नावावर दलाली करणाèया शिक्षकावंर सुधद कारवाई अपेक्षित केली असून उद्या पंचायत समितीच्या होणाèया मासिक सभेत पदाधिकारी या शिक्षण विभागाच्या गोंधळावर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.