सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे या कपलचा फोटो, वाचा कोण आहेत हे दोघे

0
79
मुंबई,दि.02(वृत्तसंस्था) : फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअपवर सध्या एक सावळ्या रंगाचा मुलगा आणि सुंदर मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. या पोस्टवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट करून त्यांची खिल्ली उडवत आहेत.विशेष म्हणजे त्याला काही समाजकंटकानी तर आरक्षणाच्या माध्यमातूनही काॅमेंटस करुन आरक्षणाचा कसा विरोध करता येईल याची उठापठक केलेली दिसून येते.तो फोटोमध्ये दिसणारा व्यक्ती दिसायला साधा दिसत असेल परंतु याच्या रंगावर व लूकवर जाऊ नका, कारण हा कोणी सामान्य व्यक्ती नसून खास व्यक्ती आहे,हे आरक्षणविरोधकांनी समजून घेतले पाहिजे.
एटली कुमार यांनी प्रसिद्ध डायरेक्टर एस शंकर यांच्याकडे पाच वर्ष काम केले. असिस्टंट डायरेक्टर कुमार यांनी फिल्म Nanban (2012) मध्ये एस शंकर यांच्यासोबत काम चालू ठेवले. हा हिंदी चित्रपट 3 इडियट्सचा रिमेक होता. कुमार यांनी अ अॅपल प्रोडक्शन सुरु केले आणि फॉक्स स्टार स्टुडिओच्या मदतीने ‘Sangili Bungili Kadhava Thorae’ चित्रपट बनवला.
जवळपास 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर एटली आणि कृष्णा प्रिया लग्नाच्या बंधनात अडकले. 2014 मध्ये झालेल्या या जोडीच्या लग्नाला दक्षिण भारतातील दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती. कृष्णा प्रिया प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून विविध सीरिअल्समध्ये मुख्य भूमिकेत काम केले आहे. या व्यतिरिक्त साऊथचा सुपरहिट चित्रपट सिंघममध्ये दिव्या महालिंगमच्या भूमिकेत कृष्णा प्रिया आहे.