राहुल गांधी शुक्रवारी मराठवाडा दौऱ्यावर

0
10

मुंबई,दि.06 – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी (दि. ८) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नोटाबंदी, सरकारची शेतकरी विरोधी धोरणे यांसह सध्यस्थितीच्या राजकीय परिस्थतीवर पदाधिकारी आणि शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, अशा स्थितीत राहुल गांधी यांचा मराठवाडा दौरा होत असल्याने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.