जेष्ठ पत्रकार गौरी लंकेशच्या हत्येचा पञकार संरक्षण समितीने नोंदवला निषेध 

0
44
नांदेड /बिलोली (सय्यद रियाज),दि.11- बेंगलोर येथील निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरानी बंदुकीतून  गोळ्या झाडून क्रूर हत्या केली.या घटनेचा पञकार संरक्षण समिती कडून भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बिलोली येथील उपविभागिय पोलिस अधिकारी  व तहसीलदारामार्फत निवेदन पाठवून जाहीर निषेध् नोंदविण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की,जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांनी अन्याय, अत्याचार ,धर्मांध शक्ति व जातीय विषमते विरुध्द प्रखड पणे लिखाण केले होते.पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जातीय विषमतेतून लंकेश यांची क्रूर हत्या करण्यात आल्याने हत्या करणाऱ्या आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी. जेणेकरून पत्रकारांची हत्या यापुढे होणार नाहीत,यासाठी संपूर्ण भारत भर पत्रकार हल्ला विरोधी कायदा लागू करावा असे निवेदनात म्हंटले अाहे.यावेळी  पञकार समिचीचे तालूका कार्याध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर, सचिव सय्यद रियाज , पाशा गादीवाले, सतीष गीरी,भास्कर कुडके, गणेष गीरगावकर,मनोहर कंचे, अनिल मोरे , वैभव घाटे, महेंद्र गायकवाड ,ईलियास फारुखी ,प्रकाश  फुगारे  पञकार  संरक्षण समितीचे पदाधिकारी व पञकार उपस्थित होते.