वनविभागातील भ्रष्टाचाराविरोधात उपवनसरंक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

0
18
 नांदेड / बिलोली,दि.14- नांदेड जिल्ह्यातील देगलूर वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सगरोळी, आरळी, तळनी, बडुर, आंजनी या गावामध्ये सन 2016/17 या वर्षात वन व मनरेगा अंतर्गत झालेल्या बोगस कामांची चौकशी करून संबधित वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्माचाऱ्यावर 16 सप्टेंबर च्या आत कारवाई करण्यात यावे. अन्यथा 17 सप्टेंबरला महाराष्ट्र मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी उपवनसरंक्षक अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा वारणेचा वाघ संघटनेचे संस्थापक सचिव संविधान दुगाने यांनी दिला आहे.
देगलूर वनपरिक्षेत्राअंतर्गत शासनाच्या पावसाळा पूर्व झाडे लावणे,व पाणि आडवा पाणि जिरवा योजनेच्या माध्यमातून खड्डे खदवाई भरवाई,झाडे लावणे,हे काम इस्टीमेंट,मेजरमेंट नुसार झाले नसून या कामातील मजूरांचे मस्टर बोगस आहे.आणि जे मजूर कामासाठी लावले गेले त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक झाली आहे.वन्यजीव धोक्यात आल्याने  एकीकडे शासन वनांच्या वाढीसाठी व पर्यावरणाच्या संरक्षनासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून विविध योजना राबवत आहे.प्रत्यक्षात मात्र वनाचे रक्षकच भक्षक झाले आहेत.ही  बाब तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमीनी वारंवार निवेदनाच्या माध्यमातून वनप्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.अद्याप पर्यंत यावर कुठलीच कारवाई झालेली नाही.बोगस कामांची चौकशी करून संबधितावर कठोर कारवाई करा अशी मागणी वाघ संघटनेच्या गौतम भालेराव यांनी तीन महिन्यापूर्वी एका निवेदनाद्वारे केली होती.आजपर्यंत सतत या बाबींचा पाठपुरावा करूनही कसल्याही पद्धतीची कारवाई झाली नसल्याने वारणेचा वाघ संघटनेचे संविधान दुगाने यांनी उपवनसरंक्षक अधिकारी नांदेड यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे.