स्वामी रामकृष्ण आश्रमशाळा मकरधोकडाची मान्यता कायमस्वरुपी रद्द

0
3

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.१६- गोंदिया जिल्ह्यातील कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी अंतर्गत येत असलेल्या देवरी तालुक्यातील स्वामी रामकृष्ण प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मकरधोकडा येथील प्रशासन सांभाळण्यात तसेच आदिवासी विद्याथ्र्यांची काळजी घेण्यात तसेच वेळोवेळी घडलेल्या आश्रमशाळेतील घटनांवर अंकुश ठेवण्यात संस्थाप्रशासन अपयशी ठरल्याने सदर आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय ११ सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.या निर्णयामुळे आदिवासी विद्याथ्र्यासांठी असलेल्या इतर आश्रमशाळा व्यवस्थापनांना मात्र धडा घेण्याची वेळ आली आहे.या सर्वप्रकरणात आदिवासी विद्याथ्र्यांच्या हितासाठी बेरार टाईम्सने सातत्याने याप्रकणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम वृत्ताच्या माध्यमातून केले होते.
आदिवासी विभागाचे उपसचिव सु.ना.qशदे यांनी काढलेल्या या निर्णयात स्वामी रामकृष्ण प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत घडलेल्या विद्यार्थी मृत्युच्या घटना तसेच कर्मचाèयांनी केलेल्या विनयभंगाच्या घटनासंदर्भात शाळा व्यवस्थापनाची दिसून येणारी उदासिनतेवरुन संस्थेचे आश्रमशाळा व्यवस्थापन व प्रशासनावर कुठलेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते.आदिवासी विद्याथ्र्यांच्या हितार्थ संस्था आश्रमशाळा चालविण्यात सक्षम नसल्याने स्वामी रामकृष्ण प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मकरधोकडाची मान्यता कायमस्वरुपी रद्द करुन तेथील विद्याथ्र्यांना नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात यावे.सोबतच शिक्षकांचे सुध्दा समायोजन करण्यात यावे असे स्पष्ट आदेश दिले आहेत.विशेष म्हणजे ४ मार्च २०१७ रोजी आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांनी सदर आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द केली होती,त्या निर्णयाच्या विरुध्द केलेल्या अपिलावर ३० मे २०१७ रोजी आदिवासी विकास मंत्री यांच्या समोर झालेल्या सुनावणीनुसार जो निष्कर्ष निघाला त्या नुसार सदर शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे.१२ जुर्ले २०१२ रोजी मकरधोकडा आश्रमशाळेत सर्पदंशाने २ विद्याथ्र्यांचा मृत्यू झालेला होता.त्याचप्रमाणे २३ सप्टेंबर २०१६ रोजी प्रकाश भग्गू मलकाम व दिपश्री गणेशराव अरकरा या विद्यार्थिनीचा २० जानेवारी २०१७ रोजी मृत्यू झालेला होता.तर इयत्ता ९ वी च्या एका विद्यार्थीनीचा २० फेबुवारी २०१७ रोजी शाळेतील एका कर्मचायाने विनयंभग केला होता.