विभागीय क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी 98 कोटींचा निधी

0
6
  नागपूर दि. 16 :- विदर्भातील खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव कमाविण्याची योग्यता असून, ती त्यांनी वेळोवेळी सिद्ध करुन दाखविली आहे. सिंथेटीक ट्रॅकवर जागतिक दर्जाचे खेळाडू घडावेत. दुस-या टप्प्यातील बांधकामामध्ये येणाऱ्या आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 88 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन
देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच सिंथेटीक ट्रॅकच्या पॅव्हेलीयनसाठी 10 कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटीक ट्रँकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हस्तांतरण व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलींद माने, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्गल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, आयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे, प्रा. संजय भेंडे उपस्थित होते. क्रीडा संकुल परिसरातील सिंथेटीक ट्रॅकव्यतिरिक्त विविध सोयीसुविधाचे बांधकाम वेगाने सुरु आहे. याच वेगाने येथील कामे करा.त्यामुळे येथील खेळाडूंना त्याचा फायदा होईल, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅकच्या पॅव्हेलीयनसाठी 10 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी क्रीडा विभाग आणि
विभागीय आयुक्त अनूप कुमार यांना लगेच तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
या स्पर्धेत सर्व खेळाडू खिलाडूवृत्तीने खेळतील. खेळात सर्वोत्तम खेळाडूचा विजयी होत असतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेतून नवी ऊर्जा, नवा आशावाद सोबत घेऊन जावा, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम भारतातील विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.यापुढे सिंथेटीक ट्रँकवर सराव करून अनेक आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील. तसेच येथे सराव करून जागतिक पातळीवर राज्य तसेच देशाचा नावलौकिक कमावतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे संचालन वृषाली देशपांडे यांनी केले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.