सिंधुदुर्गात पावसाचा कहर, 27 गावांचा तुटला संपर्क

0
46

सिंधुदुर्ग, दि. 19 -सिंधुदुर्गात जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळावारी सकाळपासून पावसाचे पाणी आल्याने माणगाव खोर्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. शाळेतील विद्यार्थी व  शिक्षक यांनाही या पाण्यामुळे  खोळंबून राहावे  लागले आहे.  मंगळवारी  माणगावचा आठवड्याचा बाजार असल्यामुळे तुफान पावसाचा अनेकांना फटका बसला आहे.
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पावसामुळे नदीकाठावर असणा-या गावातील लोकांची पळापळ झाली आहे. कुडाळ-आंबेडकर नगरमध्ये पुराचे पाणी शिरले असून काळसे बागवाडी पाण्याखाली गेली आहे. मालवण तालुक्यातील बागायत, मसुरे-कावा भागात पूरजन्य परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक अंतर्गत मार्ग ठप्प झाले आहेत.