नक्षलवाद्यांच्या खच्चीकरणाकरिता आदिवासींना मुख्य प्रवाहात आणनगरजेचे -ई.झेड.खोब्रागडे 

0
17
भूमकालतर्फे नक्षलवादी क्रांती -विचार आणि वास्तव या विषयावर परिसंवाद
गोंदिया,दि.१९-आदिसींचे मुले आता मुख्य प्रवाहात यऊ इच्छित आहेत. नक्षलवाद्याचे ले तरी आजपर्यंत पाहिलेले परिणाम त्यांना विचार करण्यास भाग पाडत आहेत. आता नक्षलवाद्यांच्या भानगडीत कुणी पडू इच्छित नाही. जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती तयार होत नाही तोपर्यंत यात काही बदल होणार नाही. नक्षलवाद्यांच्या खच्चीकरणासाठी शासकीय यंत्रणांनी विविध योजना राबवून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे प्रमुख ई.झेड. खोब्रागडे यांनी केले. येथील भवभुती रंगंमंदिरात भुमकालाद्वारे आयोजित ‘‘नक्षलवादी क्रांती-विचार आणि वास्तवङ्क या विषयावरील परिसंवादात खोब्रागडे बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे, प्रा. बबन मेश्राम, भुमकालचे अरqवद सोहनी, प्रा. श्रीकांत भोवते आदी होते.
विकास आणि नक्षलवादाचा काहीच संबंध नाही. आम्हीच आदिवासींचा विकास करु शकतो असे सांगणे हे थोतांड  सिद्ध झालेले आहे. तरुणपिठीने नक्षलवाद्यापासून दूर राहावे. नक्षलवाद्यांपासूनही दूरच राहण्याचा सल्ला खोब्रागडे यांनी तरुणांना दिला. याप्रसंगी गावंडे म्हणाले नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे वर्षातून एकदा होणाèया पोलीस भरतीत भाग घेऊन न लागणाèया मुलांना भरतीनंतरचे दिवस राज्यात व देशात स्थलांतर करवून घालवावे लागतात. यामुळे लाखोंच्या संख्येत स्थलांतर महाराष्ट्रात झाले आहे. छत्तीसगडमधील तीन लाखांच्या वर लोक भीतीमुळे आंधप्रदेशात गेले आहेत. पर्यायी विकासावर नक्षलवाद्यांनी कोणतीच योजना नाही. शिक्षणपद्धती, आरोग्यविषयी, खनिय व्यवस्था त्यांना मान्य नाही. यावर पर्यायी व्यवस्थाही त्यांच्याकडे नाही. असे असले तरी शासनाचेही यावर लक्ष नाही. शेतकरी आत्महत्यावर चर्चा होते. मात्र आदिवासी नक्षल चळवळीमुळे पटापट मरत आहेत यावर चर्चा होत नाही. भूमकालचे अरqवद सोहनी यांनी प्रास्ताविकात गोंदिया, बालाघाट, राजनादगाव हा परिसर नक्षलवादी संघटनेने ‘टायजंक्शनङ्क करुन समितीचे गठन केले आहे.  संचालन प्रा. श्रीकांत भोवते यांनी केले. आभार प्रा. योगेश भोयर यांनी मानले. कार्यक्रमा दरम्यान नक्षलवादाशी संबंधित विविध विषयावर महाविद्यालयीन विद्याथ्र्यांकरिता निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील पुरस्कार वितरण करण्यात आले.