गोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा-काँग्रेसचे निवेदन

0
10
गोरेगाव,दि.१९: गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार गोरेगावमार्फेत दिलेल्या निवेदनातून गोरेगाव तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करुन सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डेमेद्र रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामqसह बघेले, जि.प. सभापती पी.ज़ी.कटरे, जगदीश येरोला, नामदेवराव किरसान, माणिक बिसेन, डॉ. गिरधर बिसेन, भास्कर मेंढे, जितेंद्र कटरे, सुरेश चन्ने, खिरचंद येडे, उमाशंकर बहेकार,महाप्रकाश बिजेवार, हि.द.कटरे आqदच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कल्याण डहाट यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात १० लाखाहून अधिक शेतकरी-शेतमजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तत्काळ दुष्काळाची घोषणा करण्यात यावे. करवसुली थांबविण्यात यावे, सरसकट कर्जमाफी करण्यात यावे, ३५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात यावी. उपसा qसचनाचे विद्युत कने्नशन सुरु करण्यात यावे, कृषी पंपाचे कने्नशन पूर्ववत करण्यात यावे तसेच सेतू केंद्रावरील होणारी लूट थांबविण्यात यावे, वीज बिल व टेलीफोन बिलावर लावण्यात येणारे जीएसटी कर रद्द करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.