इंगळे चौक सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीची भव्य तयारी

0
41

गोंदिया,दि.२० :नवरात्र उत्सव २१ सप्टेंबरपासून सुरू होत असून गोंदिया शहरातील इंगळे चौक सिव्हील लाईन येथील श्री सर्वाजनिक दुर्गा उत्सव समितीची कार्यकारिणी घोषित झाली आहे. समितीचे हे ४९ वे वर्ष असून यावर्षी उत्सव समितीची भव्य तयारी सुरू झाली आहे. संयोजक नगराध्यक्ष अशोक इंगळे, डॉ. सुधीर जोशी व डॉ. घनश्याम तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून यावेळी त्यांनी यावर्षी दुर्गा पूजा उत्सव लोक उत्सव म्हणून भव्यतेने साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याकरिता विविध समितीचे गठन करण्यात आले असून जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. गठीत उत्सव समिती कार्यकारिणी प्रमाणे संयोजक पदी अशोकराव इंगळे, संरक्षण पदावर डॉ. सुधीर जोशी, छोटेलाल दुबे, जयंतीभाई वस्तानी, अध्यक्ष पदावर डॉ. घनश्याम (बाबा) तुरकर, कार्यकारी अध्यक्षपदी प्रशांत बोरकुटे, डॉ. ओ.पी. गुप्ता, उपाध्यक्ष पदावर अजय इंगळे, देवेश मिश्रा, संजय ओक्टे, अनिल काळे, अभय सावंत, मोहन कोतवाल, अशोक यादव, राजू शुक्ला, संजय हिसारिया, प्रदिप रहांगडाले, अनिल बिसेन, दिलीप चौरागडे, संजय दुबे यांची तर सचिव पदावर राहुल अग्रवाल, अनिल माहुले, पंकज सावंत, विवेक जगताप, सुशिल (बाल्या) केकत, बाबा पाथोडे, चंद्रभान तरोणे, अबलू पांडे, आशिष हुद्दार, योगेश गिरीया, विजय गौर, महेंद्र लिल्हारे, qपकी तिवारी, गौरव डोहरे, बबलू कावळे यांची तसेच सहसचिव पदावर जयेश परशुरामकर, अतुल ढाले, दुर्गेश लिल्हारे, गोलु तिवारी, शुभम श्रीवास्तव, कार्तिक यादव, प्रल्हाद विश्वकर्मा, सुमित तिवारी, प्रदिप भरणे, राजा कनोजिया, रुद्रेश बेंदरे, प्रकाश पर्यानी, अंकित मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच प्रमाणे कोषाध्यक्ष पदावर सतिश चव्हाण, सहकोषाध्यक्ष शैलेंद्र मिश्रा, मुकेश तिवारी, प्रचार जनसंपर्क सचिव अपूर्व मेठी, अल्ताफ शेख, रवी सपाटे, हरीश मोटघरे, आशिष वर्मा, सौंदर्यकार म्हणून अरूण नशिने, छायांकन प्रभार छायाचित्रकार सुरज नशिने, मूर्तीकार पांडूरंग कपाट, पूजा व्यवस्था प्रमुख राजा कदम, सहप्रमुख नवरतन अग्रवाल, रामदेव मिश्रा, रासगरबा दांडिया उत्सव प्रमुख पियुष सावंत, अभि यादव, अमित ढोरे, शोभायात्रा प्रमुख बटर पठाण, रवी हलमारे, सहप्रमुख मोनु सावंत, मुजीब पठाण, निरज गिरीया, अजिंक्य इंगळे, महाप्रसाद समिती प्रमुख बबन येटरे, दीपक कदम, तर सहप्रमुख पदावर राजू शुक्ला, सुजित चव्हाण यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षाच्या प्रथा परंपरेनुसार यावर्षी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नवरात्र उत्सव निमित्त इंगळे चौक येथील माँ दुर्गाचे दर्शन लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.