दुधाचे उत्पन्न वाढवून शेतकèयांना सक्षम करणार-आ.डॉ.फुके

0
11

गोंदिया,दि.२०- गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक जिल्हे असून धानाची शेती करतांना शेतकèयांना पशुधनही पाळावे लागते.आत्तापर्यंत परंपरागत पध्दतीने पशुधनाचा उपयोग होत असल्याने पाहिजे तेवढा लाभ शेतकèयांना झालेला नाही.याबाबीला हेरून अदानी फाऊंडेशनतर्फे सीएसआर योजनेतून करण्यात येत असलेल्या कामाला स्थानिक स्वयंसेवी संस्थेची व शासनाची सांगळ घालून दोन्ही जिल्ह्यातील गायी म्हशींचे कृत्रीम रेतन करुन त्यांना आर्टिफिशीयल इन्टीमेशनच्या लसीकरणातून देशी गायी म्हशींची दूध देण्याची उत्पादन क्षमता वाढविली जाणार असल्याचे विचार भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य आमदार डॉ.परिणय फुके यांनी व्यक्त केले आहे.ते तिरोडा येथील अदानी पॉवर प्रोजेक्टला भेट दिल्यानंतर अदानी व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेच्यावेळी बोलत होते.आ.फुके म्हणाले की या भागातील दुग्धउत्पादक शेतकèयांना मदर डेयरीकडून ३ रुपये अधिक दराने दूध खरेदी करण्यासंबधी बोलणी सुरु आहे.यामुळे १५-२० हजारांनी आर्थिक उत्पन्नेत वाढ होईल.अदानी फाऊंडेशन सीएसआरच्या माध्यमातून जी कामे करीत आहे,त्या कामांना शासकीय सांगळ कशी घालता येईल यावर लक्ष देऊन अधिकाधिक लाभ या भागातील जनतेला उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचे बोलले.यावेळी प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक चैतन्य शाहू,नितिन शिराडकर,गोंदिया नप उपाध्यक्ष शिव शर्मा आदी उपस्थित होते.