मुख्य बातम्या:
स्वच्छता पंधरवाड्याला जिल्हा परिषदेत शुभारंभ# #ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची आमसभा उत्साहात # #मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन# #तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा# #भारताला महासत्ता बनवायचे असेल तर वाचना शिवाय पर्याय नाही-मनोहरराव चंद्रिकापुरे# #शासनाच्या विभिन्न योजनेचा लाभ सफाई कामगार पर्यंत पोहचवावे : हाथीबेडे# #मतदार नोंदणीमध्ये महाविद्यालयांचा सक्रीय सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा# #‘नाबार्ड’द्वारा बचत गटातील महिलांना नेतृत्व विकास प्रशिक्षण# #ऑटो उलटून एका विद्यार्थ्यांचा मृत्यु, आठ जखमी# #कोंबडपार जंगलातील चकमकीत एक नक्षली ठार

गुगलने 1.1 अब्ज डॉलरला खरेदी केला HTC स्मार्टफोनचा बिझनेस

सॅन फ्रॅन्सिस्को , दि. 21(वृत्तसंसथा) – गुगलने तायवानची कंपनी HTC कडून स्मार्टफोन बिजनेस खरेदी केला आहे. गुगलने तब्बल 1.1 अब्ज डॉलरमध्ये हा करार केला. गुगलने पिक्सल फोनच्या निर्मितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
गुगल आणि एचटीसीच्या या कराराचा परिणाम थेट स्मार्टफोन इंडस्ट्रीवर होणार असल्याचं बोललं जात आहे. हा परिणाम कालांतराने पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण एचटीसीच्या टीमसोबत काम करून सॅमसंग आणि अॅपलला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न असणार आहे.  एका रिपोर्टमध्ये आलेल्या माहितीनुसार अॅपल प्रमाणे गुगल देखील स्वतःचं प्रोसेसर बनवत आहे. सध्या गुगल आपल्या पिक्सल स्मार्टफोनसाठी दुस-या कंपन्यांसोबत भागीदारी करतं आणि फोनचं हार्डवेअर इतर कंपन्या बनवतात. गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर असतं.
गुगल आणि एचटीसी यांनी यापूर्वीही एकत्र काम केलं आहे. गुगलचा पहिला नेक्सस डिव्हाइस देखील एचटीसीनेच बनवला होता.  पण या करारामुळे एचटीसीचा मोबाइल फोनचा बिझनेस ब्लॅकबेरीप्रमाणे बंद होणार नाही. यापुढेही एचटीसी स्वतःच्या ब्रॅंडसाठी काम करेल. एचटीसीचे सीईओ शीर वांग यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Share