ई पॉस मशीन नसणाऱ्या दुकानदारांची अनामत रक्कम जप्त

0
12

बुलडाणा,दि.22- जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ईपॉस मशीनचे वितरण करण्यात आले. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणून गैरव्यवहारांना आळा घालणे, तसेच स्वस्तभाव पात्र लाभार्थ्यांना धान्याचे सुरळीत वितरण व्हावे हा यामागील उद्देश होता. मात्र जिल्ह्यातील १४७ स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु काळे यांनी रास्तभाव दुकानाच्या प्राधिकार पत्राची १०० टक्के अनामत रक्कम दंड म्हणून शासन जमा केली आहे. दंडाच्या रक्कमेपोटी १ लक्ष ४७ हजार रूपये शासनजमा करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु काळे यांनी कळविले आहे.