नेहरु युवा केंद्राच्या वतीने स्वच्छता जागरुकता अभियान

0
18

हिंगोली, दि. 22 : नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता जागरुकता अभियानास मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर विकास दिवसापासून ते 02 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत सदरील अभियान असून या अभियानाचे उद्घाटन प्रा. शाळा सिद्धार्थ नगर हिंगोली येथे कै. वैजनाथअप्पा नागनाथअप्पा सराफ आणि मुख्याध्यापक शामराव इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कार्तीक इंगोले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना वैयक्तीक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता यावर चंदा रावळकर जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र, हिंगेली यांनी मार्गदर्शन केले तसेच घरोघरी शौचालय बांधून त्याचा उपयोग घेऊन आपला आरोग्य सुदृढ ठेवण्याबाबत 300 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून श्री. इंगोले यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गासहित आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेकडून सुंदरतेकडे वाटचाल करावी यासाठी मार्गदर्शन केले.
तसेच आज दि. 22 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली येथे नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक व नेहरु युवा मंडळांच्या 101 कार्यकर्त्यांसह कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराची स्वच्छता केली. या स्वच्छतेच्या उपक्रमात डॉ. जब्बार पटेल सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली, चंदा रावळकर जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनीही परिसराची स्वच्छता करून या कार्यक्रमात सहभागी झाले.