मुख्य बातम्या:
स्वच्छता पंधरवाड्याला जिल्हा परिषदेत शुभारंभ# #ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची आमसभा उत्साहात # #अखेर सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलावर अंत्यसंस्कार......# #मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन# #तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा# #भारताला महासत्ता बनवायचे असेल तर वाचना शिवाय पर्याय नाही-मनोहरराव चंद्रिकापुरे# #शासनाच्या विभिन्न योजनेचा लाभ सफाई कामगार पर्यंत पोहचवावे : हाथीबेडे# #मतदार नोंदणीमध्ये महाविद्यालयांचा सक्रीय सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा# #‘नाबार्ड’द्वारा बचत गटातील महिलांना नेतृत्व विकास प्रशिक्षण# #ऑटो उलटून एका विद्यार्थ्यांचा मृत्यु, आठ जखमी

हायड्रोजन बॉम्ब टाकून अमेरिकेला उध्वस्त करू

वॉशिंग्टन(वृत्तसंस्था)- सध्या उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील वातावरण चांगलेच तापत चालले आहे. एकमेकांना धमक्या दिल्या जात असताना उत्तर कोरियाने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. जर तुम्ही आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली, तर आमचा सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकू, अशी धमकी उत्तर कोरियाने अमेरिकेला दिली आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री याँग हो यांनी हे वक्तव्य केले आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकीची किंमत चुकवावी लागेल असे सांगितल्यानंतर काही वेळानंतर री याँग हो यांनी हे वक्तव्य केले.

री याँग हो बोलले आहेत की, प्रशांत महासागरात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हायड्रोजन बॉम्बस्फोट असेल. कशाप्रकारे ही कारवाई करण्यात येईल याचा निर्णय अद्याप झालेला नाही, कारण किम जाँग उन यांच्या आदेशानंतरच कारवाईला सुरुवात होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर चोख उत्तर देण्याचा विचार किम जाँग उन करत आहेत. री याँग हो संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आले आहेत.

Share