कर्जाची उचल न करणाèयांच्या नावे कर्जाची रक्कम

0
12
गोंदिया तालुक्यातील बिरसी सेवा सहकारी संस्थेचा प्रताप
जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल
गोंदिया,दि.२३-गोंदिया तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बिरसी(कामठा)येथील संस्थेच्या अध्यक्ष व सचिवानी मिळून गावातील शेतकèयांच्या नावावर स्वतःच कर्जाची रक्कम उचल केल्याचे प्रकरण संबधित शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास गेले असता समोर आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.या सर्व प्रकरणाची तक्रार जिल्हा उपनिबंधकाकडे करण्यात आल्याची माहिती बिरसीचे सरपंच रqवद्र तावाडे यांनी पत्रपरिषदेत दिले.बिरसी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी सुमारे ५४ लाख रुपयाचे कर्ज अशाप्रकारे विनासमंती लोकांच्या नावे उचलून स्वतःच फस्त केले आहे. तावाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊलाल बनाफर यांच्यानावे ३४ हजार ४३२,कनईqसह गहरवार यांच्या नावे ६५ हजार,उर्मिला नैकाने यानी ८ हजाराचे कर्ज घेतले परंतु त्याच्या नावे ५१ हजाराची थकबाकी मुद्दल व्याजासह दाखविण्यात आली आहे.रणजितंसिह पंडेले यांनी २००९-१० मध्ये कर्जच घेतले नाही त्या काळात ते गुजरातमध्ये असताना त्यांच्या नावे तरीही ५४ हजाराची थकबाकी दाखविण्यात आली आहे अशा अनेक शेतकèयांच्या नावावर स्वतःच कर्जाची रक्कम उचल करुन मोठ्याप्रमाणात गैरव्यहार झाल्याचे प्रकरण या कर्जमाफीच्या निमित्ताने समोर आले आहे.सेवा सहकारी संस्थेच्या अद्यक्ष व सचिवांनी केलेल्या या सर्व प्रकरणाची तक्रार करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष व सचिव सभासदांना तुमचे कर्ज पुर्ण करुन देऊ चिंता करु नका असे सांगत असल्याचेही तावाडे यांनी सांगितले.दरम्यान याप्रकरणबाबत संस्थेचे सचिव जी.एस.जांभूळकर यांना विचारणा करण्याकरिता भ्रमणध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.