शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून मात्र विरोध करणार- विनायक राऊत

0
9

सावंतवाडी, दि. 25 – महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत नाही, असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केला. दसरा मेळाव्यात शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत ही राऊत यांनी दिले ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदार राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी गाव पॅनेल आहे, तेथे शिवसेनेचे सहकार्य राहणार आहे. मात्र जेथे स्वबळावर लढण्याचे ठरवण्यात आले आहे तेथे शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवेल, असे स्पष्ट केले. आमची लढाई अद्याप कोणाशी ठरली नाही. गावात राणेंच्या समर्थ विकास पॅनेलला कोणीही साथ देणार नाही. तर काँग्रेस पूर्णपणे खिळखिळी झाली आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.नारायण राणे हे आमच्यावर टक्केवारीचे आरोप करतात. त्यांची सवय आम्हाला चांगली माहीत आहे. मी एक महिन्याचा कालावधी देतो. त्यांनी एक तरी ठेकेदार दाखवून द्यावा ज्याच्याकडून आम्ही टक्केवारी घेतो. ठेकेदार कंपनी राणेंचीच आहे. कोणाचे ते त्यांनी प्रतिज्ञापत्र घ्यावे, असे आव्हान यावेळी राऊत यांनी दिले