SBI ने 2 हजाराने कमी केली किमान शिल्लक रकमेची अट

0
9
नवी दिल्ली,दि.25 – भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना खात्यावर ठेवाव्या लागणाऱ्या शिल्लक रकमेची अट कमी केली आहे. आता 5 हजार ऐवजी 3 हजार रुपये ग्राहकांना आपल्या खात्यावर ठेवावा लागणार आहे. मेट्रो आणि अर्बन शहरांना आता एकाच कॅटिगरीत ठेवण्यात आले आहे. तसेच किमान शिल्लक रक्कम शुल्कातही 20 ते 50 टक्के कपात करण्यात आली आहे. बॅंक आता अल्पवयीन मुले, पेन्शनधारक आणि अनुदानासाठी खाते उघडणाऱ्यांकडूनही किमान शिल्लक रकमेसाठी दंड वसूल करणार नाही. एसबीआयने याचा 5 कोटी ग्राहकांना फायदा होईल असे म्हटले आहे. हा नियम ऑक्टोबर महिन्यापासून लागू होईल.