शिवराजसिंग सरकारपासून जनतेचा मोहभंग-खा.सिध्दार्थ

0
10

गोंदिया,दि.२७–शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथे बहुजन समाज पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत व१९३२ मध्ये करण्यात आलेल्या पुना पॅक्टचा विरोध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले बहुजन समाज पक्षाचे खासदार व मध्यप्रदेशचे प्रभारी अशोक सिध्दार्थ यांनी मध्यप्रदेशातील शिवराजसिंग यांच्या सरकारपासून जनतेचा मोहभंग झाला असून येत्या २०१८ च्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाची सरकार स्पष्ट बहुमताने येणार नाही.त्यावेळी आमचा बसप पक्ष हाच किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याची माहिती दिली.ते गोंदियात आले असता बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मध्यप्रदेशचे प्रदिप अहेरवार व माजी आमदार किशोर समरिते हे उपस्थित होते.
.मध्यप्रदेशातील निवडणुका लक्षात घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.सध्या परिस्थितीत ग्वालेर, रिवा आणि बालाघाट जिल्ह्यात आमच्या पक्षाचे संघटन बुथलेवलपर्यंत पोचले असून २२० जागावर उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी सुरु झाली आहे.त्यापैकी ५० जागावर आमची महत्वाची व निर्णायक लढाई राहणार असल्याचे सांगितले. विद्यमान भाजपसरकारने केलेला व्यापम घोटाळा,शेतकèयांवर केलेला लाठीहल्ला यामुद्यावर आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे,त्यासाठी येत्या २४ नोव्हेंबरला भोपाल येथे बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री मायावती यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आल्याचे खा. सिध्दार्थ म्हणाले.
गेल्या २०११ पासून मध्यप्रदेशात कुठलीही नोकर भरती झालेली नाही,त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर घटनेच्या ३४० व्या कलमानुसार मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण असायला हवे होते.पंरतु मध्यप्रदेशात आजही ५० टक्याच्यावर असलेल्या ओबीसी समाजाला फक्त १४ टक्के आरक्षण देऊन काँग्रेससह भाजपनेही या समाजाला न्यायीक हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला.विद्यमान भाजपप्रणित केंद्र सरकारने ओबीसींच्या आरक्षणात विभाजन करुन ओबीसीमध्ये ओबीसींचे वेगळे आरक्षण देण्याची घेतलेली भूमिका ही ओबीसी समाजातील जातीजातीमध्ये आंतरिक मतभेद तयार करण्यासाठी पेरलेले बिज असल्याचेही म्हणाले.ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण म्हणजे ओबीसीमधील एका जातीच्या नेत्याला त्या जातीपुरतेच सिमित करण्याचा षडयंत्र केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार करीत आहे, त्याविरोधात ओबीसींनी संघर्षाच्या लढाईत पुढे येण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांचा भारत घडविण्यासाठी कांशीरामजीने सुरु केलेली बसपा व बामसेप आजही आपल्या उदिष्ठानुसारच चालत आहेत.मात्र त्यांनी पाया रचलेल्या रिपब्लीकन पार्टीची सुरवात होताच तीन तुकड्यात विभागली गेली ती निव्वळ सत्तेच्या लोभासाठी. बसप हा पर्यायी पक्ष म्हणून समोर येत आहे. सोबतच बसपच्या मतदारांना एक सुरक्षिततेची हमी मिळाली तर ते कुठलीही सत्ता बदलविण्यासाठी तयार असल्याचे सांगत मध्यप्रदेशातील पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्या पक्षासोबत स्थानिक पातळीवर गठबंधन करायचे हे राष्ट्रीय अध्यक्ष मायावतीच ठरविणार असल्याचेही सिध्दार्थ यांनी सांगितले.