शिवसेना राहणार सत्तेतच; मंत्री मात्र बदलणार?

0
22

मुंबई ,दि.27: दस-याला सीमोल्लंघन करून सत्तेतून बाहेर पडण्याचे नगारे शिवसेनेने वाजविले असले तरी प्रत्यक्षात तो पक्ष सरकारमधून बाहेर पडणार नाही आणि सत्तेतच राहणार आहे, असे संकेत मंगळवारी ‘मातोश्री’वरील बैठकीतून मिळाले.दसºयाच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणा-या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करतील, अशी चर्चा सुरू होती. विशेषत: महागाईविरोधात शिवसेनेने जे आंदोलन केले, ते पाहता शिवसेना आता सत्तेत राहणारच नाही, असे कार्यकर्त्यांना वाटू लागले होते. पण तसे घडण्याची आता तरी शक्यता दिसत नाही.
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मराठवाड्यातील अनेक आमदार आज मातोश्रीवर गेले होते. तेव्हा सरकारमध्ये राहायचे का नाही, याबाबत काय निर्णय घ्यायचा ते माझ्यावर सोडा. मात्र काही मंत्र्यांना बदलावे या आमदारांच्या भावनेबाबत मात्र मी योग्य वेळी निर्णय घेईन, असे उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील आमदारांना सांगितले असल्याचे समजते.