जिल्ह्यात आजपर्यंत ग्रा.प.निवडणुकीकरीता फक्त 210 उमेदवारी अर्ज

0
8

गोंदिया,दि.27 : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवसापर्यंत आज बुधवार (दि.२७) फक्त २१० उमेदवारांनी नामाकंन अर्ज दाखल केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी आता दोन दिवस उरले असून शुक्रवार शेवटचा दिवस आहे.त्यातच सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द येथे बहिष्कार घालण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३४७ सरपंच व २९३९ सदस्य पदांसाठी आतापर्यंत १९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आमगाव तालुक्यात अद्याप नामांकन अर्ज दाखल झालेले नाही. ३४७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह २९३९ ग्रा.पं.सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आजपर्यंत  गोंदिया येथे सरपंचपदासाठी १० तर सदस्यपदांसाठी २८ असे एकूण ३८, सालेकसा तालुक्यात सरपंचपदासाठी ७ तर सदस्यपदासाठी ३० असे एकूण ३७, सडक-अर्जुनी तालुक्यात सरपंचपदासाठी ८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. तर तिरोडा येथे ५८ नामांकन असे एकूण ६८ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.गोरेगाव तालुक्यात सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी ११ असे एकूण १३ व देवरी तालुक्यात भागी आणि सिरपूर या दोन गावांच्या सदस्यपदासाठी फक्त २ अर्ज प्राप्त झाले आहेत. असे एकूण जिल्ह्यात २१० नामांकन अर्ज संबधित तालुका निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहे.