डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

0
13

सडक अर्जुनी,दि.27- तालुक्यातील खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत गोपाल मेश्राम या २३ वर्षीय तरुणाला सर्पदंशानंतर डाॅक्टराच्या हलगर्जीपणामुळे योग्य उपचार न मिळू शकल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर असताना त्याने उपचार न केल्याने उपचारासाठी गोपालला गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिथेही योग्य उपचार न मिळता त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले,तोपर्यंत विष संपुर्ण शरीरात गेल्याने गोपालचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेवरून गावकऱ्यांनी रोष व्यक्त करीत खोडशिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले असून इथे असलेल्या डॉक्टरांना त्वरित येथून स्थानांतरित करावे अशी मागणी त्यांनी यावेळी गावकऱ्यांनी केली.

डॉक्टरांनी अरेरावीपणाची भाषा वापरून त्यांना अपमानित केल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. डॉ. महेश बेंबाळगे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी येथे कार्यरत असून ते योग्य उपचार करित नसल्याचा आरोप आहे. प्रसंगी शिवीगाळही करतात. त्यांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे सदर युवकाचा झाला, असा आरोप गावकºयांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकावर वाहनासाठी फोन लावल्यानंतर त्यांनीसुद्धा उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीपमध्ये नेण्यात आले. गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तेव्हा त्याला साप चावले आहे, असे सांगितल्या त्याला १५ इंजेक्शन केटीएसमध्ये देण्यात आले. परंतु रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करणे गरजेचे होते. परंतु जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू फुल्ल असल्यामुळे त्याला गोंदियातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु सापाचे विष त्याच्या मेंदुपर्यंत पोहोचल्याने २२ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.गावातील युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.