मुख्य बातम्या:
बुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी

वृद्धेवर अत्याचार करून आरोपीने केली आत्महत्या

पवनी, दि. २७ – भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात  एका ६५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारला दुपारी उघडकीस आली. राहुल पुरूषोत्तम तलमले (२६) रा.भेंडारा असे मृत आरोपी तरूणाचे नाव आहे.  पवनी तालुक्यातील भेंडारा येथील ही महिला घरी एकटी राहत होती. २५ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास आरोपी राहुल तलमले हा त्या महिलेच्या घरी गेला. तिच्या तोंडात कापड टाकून अत्याचार केला. त्यानंतर तिचे डोके भिंतीवर आपटून तिला मारहाण केली. यात ती गंभीररित्या जखमी झाली. दरम्यान घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून देऊन तो तिथून फरार झाला. रात्रभर ही महिला बेशुद्धावस्थेत राहिली. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी तिला शुद्ध आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर काल रात्री पवनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पवनी पोलिसांनी रात्रभर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी कुठेही सापडला नाही. दरम्यान, आज बुधवारला दुपारी एका तरूणाचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात तरंगताना आढळून आला. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असता तो बलात्कार करून फरार झालेला राहूल तलमले नामक आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पवनी मृत आरोपीविरूद्ध भादंवि ३७६, ३०७, ४५० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पवनीचे पोलीस निरीक्षक सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक चेतन बोरखडे हे करीत आहेत.

Share