एक रुपयात लग्न; सर्वधर्मीयांसाठी माळी संघाचा मेळावा

0
11

अमरावती,दि.28– लग्न म्हटले तर खर्च अालाच. अाज एका लग्नावर जवळपास लाखाे रुपयांची उधळण केली जाते. वेळप्रसंगी कर्जाचा डाेंगर अंगावर घेत मुला-मुलींचे लग्न लावून दिले जाते. या सामाजिक परिस्थितीची जाण ठेवत अमरावतीच्या सर्वशाखीय माळी संघाने कोणत्याही जाती-धर्मातील विवाहेच्छुकांचा विवाह केवळ एका रुपयात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला अाहे.अमरावती येथील ज्ञानेश्वरी सांस्कृतिक भवनात ९ डिसेंबरला राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महामेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले अाहे. यात माळी समाजातील विवाहेच्छुकांची नाेंदणी नि:शुल्क असून इतर जाती, धर्मातील इच्छुकांना केवळ १ रुपया देऊन नाेंदणी करावी लागणार अाहे. विवाहेच्छुकांच्या नि:शुल्क नाेंदणीसाठी प्रा. श्रीकृष्ण बनसाेड (९७६३४०३७४८) यांच्याशी संपर्क साधवा.