रांगोळीतील कला-संदेशांसाठी डिजिटल व्यासपीठ ‘माय गव्ह’च्या माध्यमातून रांगोळी स्पर्धेचे आयोजन

0
15

मुंबई, दि. 28 : नागरिकांचा शासनातील सहभाग वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या माय गव्ह (MyGov) महाराष्ट्र वेब पोर्टलच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या देशभरात ऊर्जा व सकारात्मकतेचे प्रतिक असलेल्या विविध सण-उत्सवांचे आनंददायी वातावरण आहे. यानिमित्ताने घर, कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी रांगोळ्या काढल्या जातात. रंग आणि आकाराच्या माध्यमातून कला, भावना आणि सामाजिक संदेशांचे प्रदर्शन करण्याचे रांगोळी हे एक चांगले माध्यम आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपण काढलेला रांगोळीचा फोटो https://maharashtra.mygov.in या लिंकवर अपलोड करावा. सहभागी स्पर्धकांनी 2 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2017 या कालावधीतच रांगोळी काढलेली असणे आवश्यक आहे. यासाठी घरासमोर काढलेली साधी रांगोळीही पात्र असेल. या रांगोळीद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केल्यास
त्याचे स्वागतच असेल. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणाऱ्या रांगोळीमध्ये ‘MyGov’ हे शब्द असणे अनिवार्य आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट तीन रांगोळींना माय जीओव्हीच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल.