मुख्य बातम्या:
खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात# #मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी-ऊर्जामंत्री# #एक शाम राष्ट्र के नाम' कवि संमेलन आज - भाजयुमोचे आयोजन# #तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात# #अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी# #सिरोंचा येथील युवकांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड# #संघी टाॅपर्स अवॉर्ड समारोह ४ फेब्रुवारीला# #समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल# #स्वच्छ शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन पुरस्कार मिळावा# #आर्थिक लाभासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी,शासनाची दिशाभूल-राकेश ठाकुर

निवडणुकीपूर्वी आणीबाणी येणार-रामदास फुटाणे

पुणे,दि.30-‘देशात २०१९च्या आधी आणीबाणी जाहीर होईल. काँग्रेसने आणीबाणीत जनतेला अठरा महिने तुरुंगात ठेवले, हे भाजपचे सरकार ३६ महिने तुरुंगात ठेवेल. देशातील परिस्थिती प्रक्षोभक होत आहे. अशा वातावरणात सरकारला सदबुद्धी मिळो. लोकशाही जिवंत राहो…’ अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी गुरुवारी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित सांस्कृतिक कट्टा उपक्रमात ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शैलेश काळे व सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते. फुटाणे यांनी या वेळी जामखेड ते बर्लिनपर्यंतचा प्रवास, सामना चित्रपटाची निर्मिती, शिक्षक, वात्रटिकाकार, आमदार अशा विविध भूमिका, तसेच राजकीय मंडळींच्या गमती-जमती आणि स्नेह अशा विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या. बदललेली राजकीय, आर्थिक व्यवस्था, तसेच जातीय मोर्चे यावर त्यांनी घणाघात केला.‘जगात हिंसा वाढत चालली आहे. सरकार विरोधी लिहिले म्हणून नोटिस पाठवणे वाईट आहे. अशा प्रकारांचा निषेध केला पाहिजे,’ असे फुटाणे यांनी आवर्जून नमूद केले. ‘समाजाचे प्रश्न आर्थिक असताना जातीचे मोर्चे निघत आहेत. राजकारण हा बागायतदार, जमीनदारांचा खेळ आहे. पूर्वीच्या राजकारणाला वैचारिक बैठक होती. आता ते उत्पन्नाचे साधन आहे; पण सत्तेची भूक सर्व काळात सारखीच असते. देशाची तीस वर्षे जात गोंजारण्यात गेली आहेत. जाती घट्ट केल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. व्यासपीठावर फुले, शाहू, आंबेडकर नारा देणारे खाली आले की मात्र जात पाळतात. मतदारसंघात जातीची घरे किती हा विचार केला जातो. देशापेक्षा धर्म, धर्मापेक्षा जात आणि जातीपेक्षा पोटजात महत्त्वाची झाली आहे. जात आणि धर्माच्या विरोधात बोलण्याची हिमंत कोणत्याही राजकीय पक्षात नाही. हे राजकारण देशाची वाट लावत आहे,’ असा हल्ला फुटाणे यांनी चढवला.

Share