मुख्य बातम्या:
पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न# #जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द- पालकमंत्री बडोले# #वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ# #शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड# #क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम १६ सितंबर को# #दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

पाकिस्तानने LoC जवळ खोदले 14 फुट सुरंग

अरनिया/जम्मू(वृत्तसंस्था)दि.01- –काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये लाइन ऑफ कंट्रोल (LoC) वर 14 फूट लांब सुरूंग सापडले आहे. येथून काही शस्त्रे आणि खाण्या-पिण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. बीएसएफने सांगितले की, या सुरूंगातून घुसखोरी करून देशातील उत्सवाच्या काळात दहशतवादी कारवाया करण्याचा दहशतवाद्यांचा मनसूबा होता. परंतु, आता तो उधळून लावण्यात आला आहे. अरनिया सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांत शस्त्र संधी उल्लखनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 17 सप्टेबरला पाकिस्तान रेंजर्सने केलेल्या फायरिंगमध्ये 3 नागरिक जखमी झाले होते. जम्मू फ्रटियरचे बीएसएफ आयजी राम अवतार यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या बाजूने 14 फूट लांब सुरूंग खोदण्यात आले होते. यातून युध्दजन्य परिस्थितीत लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. अद्याप हे सुरूंग पुर्ण झाले नव्हते. विक्रम आणि पटेल पोस्टजवळ साफसफाई करताना बीएसएपच्या जवानांना हे भुयार आढळून आले होते. बीएसएपने सांगितले की, सुरूंगातून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून हे सिद्ध होते की, येथे शस्त्रधारी लोक राहत होते. परंतु, ते पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. अरनियामध्ये पाकिस्तानाकडून होणाऱ्या शस्त्रसंधीचे उल्लघन पाहता अंतरराष्ट्रीय सीमेवर सुरूंगांचा शोध घेण्याची मोहिम राबवण्यात येत आहे. भुयारातून मॅग्जीन, भरलेले कारतून, एलईडी हेड लाइट्स, बॅट्री, टेक्निकल साहित्य, अनेक दिवस पुरेल एवढे खाण्या-पिण्याचे साहित्य मिळाले आहे. खाद्य पदार्थांच्या पॅकेट्सवर उर्दूतून नावे लिहिलेले आहेत.
Share