हिमाचलमध्ये निवडणूक; ९ नोव्हेंबर रोजी मतदान , गुजरातच्या तारखा जाहीर नाही

0
8

नवी दिल्ली,दि.13: हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सर्व ६९ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा मात्र त्यांनी जाहीर केल्या नाहीत. मात्र गुजरातमध्ये १८ डिसेंबरपूर्वी निवडणुका होतील, असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशात ९ नोव्हेंबर रोजी ७,४७९ मतदान केंद्रांवर एकाच टप्प्यात मतदान होईल.सर्व केंद्रांवर मतदारांनी केलेल्या मतदानाची लेखी पावती देण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राची सोय असेल. मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.
विधानसभेची मुदत ७ जानेवारी रोजी संपत आहे. गुजरातच्या निवडणुका जाहीर न केल्याबद्दल काँग्रेसने आयोगावर टीका केली आहे.आयोगाची भूमिका गुजरातकरीता केंद्र सांगेल अशीच असल्याची टिका केली आहे.