सेन्सेक्स पोहोचला ३३ हजारांवर

0
12

नवी दिल्ली,दि.25(वृत्तसंस्था) – शेअर बाजासाठी बुधवारचा दिवस खरोखरच खूप महत्त्वपूर्ण असा ठरला. शेअर बाजारात बुधवारी बम्पर अशी सुरुवात झाली. शेअर बाजार 450 अंकांनी वधारत सेन्सेक्स 33, 086 वर पोहोचला तर निफ्टीनेही 10,300 अंक पार करत नवा विक्रम केला. असे म्हटले जात आहे की मंगळवारी अर्थव्यवस्थेतील मगरळ दूर करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने 2.11 लाख कोटी रुपयांचे साहाय्य आणि  6 कोटी 90 लाख रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची घोषणा केल्यानंतर याचे परिणाम बुधवारी शेअर बाजारावरही दिसले.