विद्यार्थ्यांच्या लढ्याला सामुहिक यश,कुलगूरींनी दिली परिक्षेला बसण्याची परवानगी

0
6
विद्यार्थाना द्वितीय सत्रात दोन्ही सत्र देण्याची मुभा
लाखनी,दि.27- स्थानिक समर्थ महाविद्यालय येथील ३३ विद्यार्थांना एम कॉम प्रथम सेमिस्टर परिक्षेपासून महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे वंचित करण्यात आल्याचे वृत्त बेरार टाईम्स न्युजपोर्टलने प्रकाशित करताच त्या वृत्ताची दखल घेत भंडारा गोंदियाचे विधानपरिषद सदस्य डॉ परिणय फुके, माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थाध्यक्ष आल्हाद लाखनीकर यांनी दखल घेत विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचविण्यासाठी धडपड सुरु केली. आणि नागपूर विद्यापीठाचे कुलगूर डाॅ.काणे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.त्यानंतर कुलगूर काणे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना द्वितीय सत्रातील प्रथम सत्राची परीक्षा देण्याची मुभा दिली. त्यावेळी आमदार परिणय फुके यांचे प्रतिनिधी संदीप नागदेवे, माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
घेतली. समर्थ महाविद्यालय परीक्षा केंद्र क्रमांक ४१७ यावर एम कॉम या विषयाची सलग्निकरन न करता ३३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. परंतु दि २५ ऑक्टोबरला पहिला पेपर असताना विद्यार्थांना परीक्षा प्रवेश पत्र महाविद्यालयातुन प्राप्त झाले नाही. प्राचार्य डॉ पोहरकर यांना विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता त्यांनी सलग्निकरन न झाल्यामुळे आपणास परीक्षेस बसता येणार नाही,असे सांगितले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्याबाबत विद्यार्थ्यांकडून अर्ज लिहून आपले मूळ कागदपत्रे वापस घेण्यास सांगितले. ही बाब विद्यार्थ्यांनी विधानपरिषद सदस्य आमदार डॉ परिणय फुके यांना सांगितली आणि वेळीच दखल घेत त्यांनी विद्यापीठ कुलगुरू डॉ सिद्धार्थविनायक काणे याना विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यास सांगितले.तात्पुरते विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान टाळता आले असले तरी पुढील भविष्य मात्र अजूनही अंधकारमय आहे.  महाविद्यालयाला तत्काळ सलग्निकरन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आदेश देण्यात आले असून विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास महाविद्यालयातुन होणार नाही असे यावेळी कुलगुरू यांनी सांगितले.बैठकीला प्राचार्य पोहरकर अनुपस्थित होते. या बैठकीला हर्षा जवंजाळ, पल्लवी पंधरे, मनीषा भानारकर, मेघा बांगडकर, अर्चना निमजे, श्रुती वासनिक, दीपक टेकाम, योगेश निखारे, विक्की बुंदेले अशी ३२ विद्यार्थी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या चुकीमुळे एम कॉम विद्यार्थी परीक्षेस बसू शकले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालयाला सलग्निकरण प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या सत्रात प्रथम आणि द्वितीय सत्र परीक्षा देण्याची सोय या विद्यार्थ्यांसाठी करून देण्याचा निर्णय आज विद्यापीठाने घेतला आहे.

डॉ सिद्धार्थविनायक काणे कुलगुरू,रा तू म विद्यापीठ, नागपूर
समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील ३२ विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिले असे कळताच आम्ही विद्यापीठ कुलगुरू यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यावर योग्य ती भूमिका घ्यावी हे सांगितले. कारण महाविद्यालयाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये. आज विद्यापीठात कुलगुरू सोबत बैठकीत त्यावर तोडगा निघाला आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवता आले.परिणय फुके आमदार, विधानपरिषद