4 नोव्हेंबरच्या मोर्च्यासाठी शिक्षक समन्वय समितीची सभा

0
9

गोंदिया,दि.28- राज्यसरकारकडून प्राथमिक शिक्षकांना विविध प्रकारे दिल्या जाणार्या भेदभावपुर्ण वागणूकीचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या 4 नोव्हेंबर रोजी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्या मोर्च्याला यशस्वी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा समन्वय समितीची  आक्रोश मोर्च्यासंबधी आज गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेला  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघ, जूनी पेन्शन हक्क संघटना, पदवीधर शिक्षक महासंघ ,महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ , महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना ईत्यादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यामध्ये विरेंद्रकुमार कटरे,मनोज दिक्षित, नुतन बांगरे,वाय.एस.भगत,अरविंद घरडे, भुषण डोंगरे,शालिक कठाणे,यु.पी.पारधी,अनिरुध्द मेश्राम,एन.बी.बिसेन, चंदु दुर्गे ,विनोद लिचडे, हेमंत पटले, राजू गुण्णेवार ,जी.जी. खराबे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले